पुण्यात 'हिट अँड रन' ची पुनरावृत्ती; भरधाव आलिशान कारने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

    11-Oct-2024
Total Views | 61

pune hit and run
 
पुणे : (Hit and Run Case) काही महिन्यांपूर्वी पुण्यामधील कल्याणी नगर येथे घडलेली हिट अँड रन ची घटना बराच काळ चर्चेत होती. यातच पुन्हा पुण्यातून एक हिट अँड रन ची घटना समोर येत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भरधाव आलिशान कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात २१ वर्षीय तरुण रौफ अकबर शेख याचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपी आयुष तायल हा रांजणगाव एमआयडीसीमधील एका फर्ममध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कार चालवताना आरोपी आयुष तायलने २ दुचाकींना धडक दिली होती. पहिल्या दुचाकीच्या धडकेने जीवितहानी झाली नाही परंतु त्यानंतर पुढे काही मीटर अंतरावर दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत रौफ शेख याचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर रात्री १ वाजता हा अपघात घडला आहे. या घटनेत कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात झाल्यावर कारचालक घटनास्थळावरुन भरधाव पळून गेला होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला तातडीने अटक केली आहे.
 
आरोपीने दारूच्या नशेत हा अपघात केला आहे का याबाबतदेखील वैद्यकीय अहवालानंतर तपास करण्यात येणार आहे. तसेच मृत झालेला मुलगा हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121