मुंबई : 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मधील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. एसबीआयमधील रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करावयचा आहे. दरम्यान, 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी पदवीधरांना मिळणार आहे. त्यासाठी पदवीधर उमेदवारांना बँकेच्या
अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरावा लागेल.
तसेच, 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मार्फत प्रोबिशनरी ऑफिसर्स भरती प्रक्रियेद्वारे एकूण २००० पदांची भरती केली जाईल. यासाठी प्रिलियम परीक्षा नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतली जाईल. त्याचबरोबर उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावे. यासोबतच शासकीय नियमानुसार श्रेणीनिहाय वयोमर्यादेतही सवलत दिली जाणार आहे. अर्ज भरण्यास सुरूवात दि. ०७ सप्टेंबर पासून होणार असून दि. २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु असणार आहे.
उमेदवारांसाठी अर्ज शुल्क प्रवर्गानुसार ठरविण्यात आले आहे. यानुसार, सामान्य/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. ७५० भरावे लागतील आणि SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. तसेच, उमेदवारांनी एकदा भरलेले अर्ज शुल्क परत केले जाणार नाही.