मुंबई : 'सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदाकरिता परीक्षा सुरु झाली असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत आता बदल करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील परीक्षा याआधीच झाली असून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या प्रतीक्षेत परीक्षार्थी असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधिक म्हणजेच लीगल कायद्यांतर्गत 'अ' श्रेणीच्या अधिकारी या प्रवर्गातील सहाय्यक व्यवस्थापक या रिक्त पदाच्या भरतीसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा आधी दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार होती. परंतु, प्रशासकीय कारणांमुळे आता हीच परीक्षा दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती सर्व उमेदवारांना सेबीच्या अधिकृत वेबसाईटवर डाऊनलोड करता येईल. तसेच, सेबीकडून ईमेल किंवा एसएमएस द्वारे योग्य माहिती पोहोचविली जाईल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.