'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलीसी'बाबत चर्चेसाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासन आणि नागरिकांची बोलावली बैठक

    13-Sep-2023
Total Views | 41
 
mangalprabhat lodha


 मुंबई :
मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी 'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी'चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणा अंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खासगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत्र आणून एकमताने जनहिताचा योग्य निर्णय घेता यावा, या उद्देशाने पालकमंत्री लोढा यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
 
"या बैठकीच्या माध्यमातून ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसीबाबत खुली चर्चा व्हावी, नागरिकांनी आपली मते मांडावी आणि जनहिताचा निर्णय व्हावा इतकाच सरकारचा उद्देश आहे. आमचे सरकार हे लोकसांठी, लोकांमध्ये जाऊन काम करणारे सरकार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या तक्रारी आणि मते मांडायला व्यासपीठ मिळेल याची आम्ही सदैव काळजी घेऊ!" असे पालकमंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121