कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
05-Aug-2023
Total Views | 544
मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.