ठाकरेसाहेब, शिवछत्रपतींचा पुतळा हटवणाऱ्यांना हा टीझर मान्य आहे का? कर्नाटक काँग्रेसचे नेते शिवछत्रपतींपुढे नतमस्तक का होत नाही?
31-Aug-2023
Total Views | 59
मुंबई : विरोधकांच्या आघाडीची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीचे यजमानपद ठाकरे गटाकडे आहे. या बैठकीच्या प्रचारासाठी उबाठा गटाने एक व्हीडिओ जाहीर केला होता. या व्हीडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा उल्लेख करत भाजपा सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या या प्रयत्नात ते स्वत:च फसलेले दिसत आहेत.
व्हीडिओत भाजपा सरकारचा उल्लेख हुकुमशाही सरकार म्हणून करण्यात आला आहे. त्याच बरोबर विरोधकांची आघाडी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी करण्यात आली आहे, असा दावाही या व्हीडिओतून करण्यात आला आहे.
पण उबाठा गटाच्या या व्हीडिओचा नेटकऱ्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. एका नेटकऱ्याने उबाठा गटाला विचारले की, तुमचा हा व्हीडिओ कर्नाटकमध्ये छत्रपतींचा पुतळा हटवणाऱ्या काँग्रेस नेत्यांना मान्य आहे का? तर दुसऱ्या नेटकऱ्याने उबाठा गटाला, कर्नाटकमधील काँग्रेस नेते छत्रपतींपुढे नतमस्तक का होत नाहीत? असा सवाल केला.