मुंबई मेट्रोमध्ये महापालिकेचा सहभाग नाही याला कारण उद्धव ठाकरेच!
30-Aug-2023
Total Views | 179
मुंबई : मुंबई मेट्रो उभारणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. ज्याप्रमाणे पुणे, नागपुर मेट्रोसाठी त्या त्या महापालिका खर्च करतात, तसेच मुंबई महापालिकेचा मुंबई मेट्रो उभारणीत आर्थिक सहभाग का नाही? असा सवाल ही उपस्थित केला जात असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळते आहे. तर, याचे उत्तर उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मविआ काळात मेट्रो कामांमध्ये खोडा घातला. मेट्रो कामात आडकाठी घातली.
कांजूरमार्ग कारशेड आणि आरे कारशेडवरुन राजकारण तापवलं!
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आलं होतं. पण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत कांजूरमार्ग कारशेड आणि आरे कारशेडवरुन राजकारण तापवलं. मेट्रो ही जनतेच्या विरोधातच आहे, असे बिंबवण्यासाठी प्रयत्न त्यावेळी ठाकरेंनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास कामांना लावलेला ब्रेक उखडून टाकत महायुती सरकारने विकासाला गती दिली आहे. आरे कारशेडवरुन निव्वळ राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हा मोठा दणका मानला जात आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला. काल (२९ ऑगस्ट) मंत्रालयातील वॉर रूममध्ये राज्यातील १० महत्त्वांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो विषयाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुंबई महापालिकेचा हातभार आणि सहकार्य असतं तर प्रकल्प आणखी यशस्वीरित्या आणि जलदगतीने राबवता आला असता. पण, ठाकरेंच्या आडकाठी धोरणामुळे मुंबईकरांचे दहा हजार कोटी बुडाले. उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळेच मुंबईत मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडला.