मुंबई : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीप्रक्रियेतून १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. 'सीआयपीईटी'मध्ये एकूण रिक्त असलेल्या ६० जागांसाठी ही भरती केली जाणार असून पात्र उमेदवारांनी २ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करायचे आहेत.
दरम्यान, या भरतीप्रक्रियेत व्याख्याता, सहायक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ई-मेल पद्धतीने करायचा आहे. (ई-मेल पत्ता – cipetchanvtc@gmail.com)या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
तसेच, अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडणे अत्यावश्यक असणार आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२३ आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.cipet.gov.in ला भेट द्या.