मेवातीतला हिंसाचार चिथवण्यामागे 'पाकिस्तानी' कनेक्शन!

    02-Aug-2023
Total Views | 63
pakistani 
 
चंदीगड : हरियाणात हिंदूंनी आयोजित केलेल्या जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केल्यानंतर उसळलेल्या नूह हिंसाचाराच्या दरम्यान, एक यूट्यूब व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्वतःला 'अहसान मेवाती पाकिस्तानी' नावाचा होस्ट मेवाती मुस्लिमांना हिंसाचार घडवण्यासाठी आणि हिंदूंना मारण्याची चिथावणी देताना दिसत आहे.
 
 
हिंसाचाराच्या एक दिवस आधी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये अहसानने हिंदूंना अजिबात सोडले जाऊ नये असे म्हटले होते. “हा मोनू मानेसर मेवातला येतोय. त्याला मारले पाहिजे. मेवाती इतके का घाबरले आहेत? या हिंदूंना मारहाण करून धडा शिकवला पाहिजे,” असे अहसान म्हणताना ऐकू येत आहे.
 
हरियाणातील मेवात भागातील रहिवासी असलेला व्हिडिओ होस्ट पाकिस्तानच्या प्रेमात असल्याचे दिसते कारण त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या नावात 'पाकिस्तानी' जोडले आहे. व्हिडिओमध्ये अहसानने हिंदूंना शिवीगाळ केली आणि हिंदू महिलांसाठी अपमानास्पद भाषा वापरली.
 
तो म्हणाला की, “मेवाती आता आक्रमक झाले आहेत. मी सर्व मेवाती मुस्लिमांना विनंती करतो की आक्रमकता जिवंत ठेवा आणि त्याला (मोनू मानेसर) ठार करा. या तर मरा किंवा मारा” अहसान सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे म्हणताना ऐकले जाऊ शकते.
 
तो पुढे बोलताना म्हणाला की, मोनू मानेसर आला तर त्याला स्वतःच्या पायावर परत जाऊ देऊ नये. जुनैद, नासिर इत्यादींचा बदला घेण्यासाठी तो मेवातच्या मेवाती मुस्लिमांना भडकवतो आणि म्हणतो की मेवाती मुस्लिमांनी आता लढायला हवे. “हिंदू तलवारीचे टोक पाहून घाबरतात. पण आम्‍ही मेवाती मुस्‍लीम वार करू शकतो, आम्हाला भीती वाटत नाही.”
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121