हरियाणामधील नूह येथे झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल काँग्रेसचे आमदार मामन खान यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगीना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सहा एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींसोबत मामन खान यांचे हिंसाचारपूर्व संभाषण आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेले संदेश रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
Read More
हरियाणाच्या मेवात प्रदेशात बृजमंडल यात्रेदरम्यान, ३१ जुलै २०२३ रोजी नूहं हिंसाचारात सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीशी पोलिसांची चकमक झाली. दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. ओसामा उर्फ पहलवान असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. हिंसाचाराच्या वेळी नल्हड मंदिराभोवती जाळपोळ करण्यात ओसामाचा हात असल्याचा आरोप आहे.
३१ जुलै रोजी हरियाणातील नूह येथे कट्टरपंथी जमावाने हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर हल्ला केला होता. या हल्लात ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या यात्रेतही व्यत्यय आला. ही यात्रा पुन्हा करण्यासाठी हिंदू संघटनांनी रविवारी (१३ ऑगस्ट २०२३) पलवलमधील पोंडरी येथे महापंचायत घेतली.
हरियाणा एसटीएफ आणि पोलिसांच्या पथकाने नूह हिंसाचार प्रकरणातील आरोपींना पकडण्यास सुरुवात केली आहे. यातच आता पोलिसांनी फिरोजपूर येथून अफझलला अटक केली आहे. अफझलने इंटरनेटवर प्रक्षोभक व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश पोस्ट केले होते.
हरियाणातील मेवात येथील ३१ जुलै २०२३ रोजी जलभिषेक यात्रेत सहभागी असलेल्या हिंदू भाविकांवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. संपूर्ण नियोजन करून हा हल्ला करण्यात आला. यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये पाठवण्यात आलेले ऑडिओ इंडिया टुडे ग्रुपच्या हाती लागले आहेत. त्या ऑडिओनुसार कट्टरपंथीनी विशिष्ट समुदायाला हिंदूंवर हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
नूह हिंसाचारात आतापर्यंत सरकारने केलेल्या कारवाईत ६०० हून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला असून सुमारे १०४ एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तसेच, या हिंसाचाराप्रकरणी २१६ जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत ८३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, हा हिंसाचार पूर्वनियोजित असून एक मोठे षडयंत्र असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
नूंह येथील हिंसाचारावर आता भाजपने काँग्रेसवर आरोप केले आहेत. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी दि. ३ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या एका आमदाराने प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्रिवेदी म्हणाले, काँग्रेस आमदाराची फेसबुक पोस्ट हिंसा भडकवणारी आहे. त्यामुळे हा हिंसाचार एका मोठ्या कटाचा भाग असल्याची शंका निर्माण होते, असे ही त्रिवेदी म्हणाले. त्यामुळे दिल्लीत ताहीर हुसैन होता, तसा मेवातमध्ये मामन खान आहे आणि तो कॉग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतो हे स्पष्ट झाले आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मेवातच्या नूह येथे हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर झालेल्या हल्ल्यामागे मोठा कट असल्याची शंका व्यक्त केली आहे. पीडित जे काही बोलत आहेत त्यावरूनही हा हल्ला अचानक नव्हता हेच दिसून येते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. मुस्लिम जमाव हिंदूंची वाट पाहत होता. हिंदूंना रात्रीपर्यंत मंदिरात रोखून धरून त्यांची हत्या करण्याची त्यांची योजना होती. असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
केंद्र सरकार हरियाणाच्या मेवातमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) चे विशेष आणि कायमस्वरूपी स्टेशन स्थापन करणार आहे. मुस्लिमबहुल असलेला हा जिल्हा अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच आरएएफच्या कायमस्वरूपी स्टेशनची पायाभरणी करणार आहेत.
हरियाणाच्या मेवातमध्ये सोमवारी (३१ जुलै २०२३) हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. त्याचवेळी डझनभर वाहने पेटवून देण्यात आली. या दंगलीतील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक जखमी हरियाणा पोलिस कर्मचारी नूह दंगलीची माहिती देत आहे.
हरियाणाच्या मेवातमध्ये दि. ३१ जुलै रोजी शोभा यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ११६ हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांची रिमांडवर चौकशी करण्यात येणार आहे. या परिसरात जलद कृती दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी हिंसाचाराच्या वेळी मुस्लिम जमावाने केलेल्या क्रूरतेबद्दल सांगितले. तसेच, समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये अल्ला हू अकबर, नारा-ए-तकबीरचा नारा देत गर्दी रस्त्यावर फिरताना दिसली.
हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै २०२३) जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निर्दोष लोकांचा बळी गेला आहे. प्रदीप कुमारही या हिंसाचाराला बळी पडले आहेत. नल्हाड मंदिराजवळ झालेल्या हल्ल्यात प्रदीप कुमारला सुखरूप बाहेर पडले होते. पण कट्टरपंथीयांनी मंगळवारी (१ ऑगस्ट २०२३) त्यांची घरी जात असताना हत्या केली ऑप इंडियाने प्रदीप कुमार यांच्यासह घटनेच्या वेळी उपस्थित कपिल कुमार त्यागी यांच्याशी चर्चा केली. या हल्ल्यात कपिल त्यागींही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कप
कट्टरपंथीय दंगलखोरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. हिंदुस्तान टाइम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालात हल्लेखोरांनी हरियाणाच्या मुस्लिम बहुल नूंह जिल्ह्यामध्ये जलाभिषेक यात्रेवर हल्ला करण्याची योजना कशी आखली याचा खुलासा करण्यात आला आहे.
हरियाणात हिंदूंनी आयोजित केलेल्या जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केल्यानंतर उसळलेल्या नूह हिंसाचाराच्या दरम्यान, एक यूट्यूब व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्वतःला 'अहसान मेवाती पाकिस्तानी' नावाचा होस्ट मेवाती मुस्लिमांना हिंसाचार घडवण्यासाठी आणि हिंदूंना मारण्याची चिथावणी देताना दिसत आहे.
हरियाणाच्या मेवातमध्ये, जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या यात्रेत हजारो महिलांचाही सहभाग होता. या महिलांना कट्टरपंथीयांनी सुमारे ५ तास वेठीस धरले होते. अखेर पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. मेवातमधील नुहानपासून सुरू झालेला हिंसाचार गुरुग्राममधील सोहनापर्यंत पसरल्यानंतर राज्यातील भाजप सरकारने मेवात, गुरुग्राम, फरिदाबाद आणि रेवाडी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे.
३१ जुलै २०२३ रोजी हरियाणातील मेवात येथील नूह येथे हिंदूंच्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. हिंसाचारग्रस्त भागात अजूनही हजारो यात्रेकरू अडकले आहेत, असे मीडिया अहवालात म्हटले आहे. दरम्यान, हिंसाचाराची आग गुरुग्राममधील सोहनापर्यंत पोहचली आहे. येथेही वाहनांना आग लावल्याचे वृत्त आहे.
३१ जुलै २०२३ (सोमवार) रोजी हरियाणातील नूह येथे जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचारात २ होमगार्ड जवानांसह एकूण ३ जणांचा मृत्यू झाला. परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२३ रोजी हरियाणाच्या नगीना परिसरातून आणखी ३ मृतदेह सापडले आहेत.
हरियाणातील मेवात येथे हिंदूंच्या धार्मिक शोभायात्रेवर हल्ला करण्यासाठी मौलवींनी मुस्लिमांना भडकविले आहे. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद (विहिंप) लढा देणार असून मेवातला हिंदूंचे कब्रस्तान बनू देणार नाही, असा इशारा विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी पत्रकारपरिषदेत दिला आहे.
हरियाणातील नूह येथील ब्रज मंडल यात्रेवर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. दंगेखोरांनी ५ गाड्या पण पेटवून दिल्या. तणावाची स्थिती पाहता नूह आणि हातीनमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
यापूर्वी ८ जून २०२२ रोजी भीम सेना प्रमुख नवाब सतपाल तंवरनेही नूपुर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर भीम सेनेतर्फे कानपुरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाबद्दल नुपूर शर्मालाच दोषी ठरविले होते. भीम सेनेचा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष सतपाल तंवर म्हणाला होता की. “नूपुर शर्माने नबीचा अपमान केला आहे. ज्यामुळे कोट्यवधी धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांना अटक झालेली नाही."
हैदराबादमधील किमान अर्धा डझन मुस्लीम कुटुंबांनी या कायद्याच्या भीतीने बदलली मुलींच्या लग्नाची तारीख
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने नुकत्याच शोधलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ग्रहाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील उस्ताद पंडित जसराज यांचे नाव दिले. त्यामुळे आता ग्रह ताऱ्यांना सुद्धा पंडित जसराज यांच्या सुरांची सर लाभली ही खूपच आनंदाची आणि भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.