CAG Recruitment 2023 : १२ वी पास आणि पदवीधरांना नोकरीची संधी
18-Aug-2023
Total Views | 83
मुंबई : भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अर्थात (कॅग) अंतर्गत मोठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागांतर्गत १,७७३ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट cag.gov.in ला भेट द्या.
कॅगमध्ये होणाऱ्या भरतीप्रक्रियेमुळे बारावी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२३ आहे. त्याचबरोबर उमेदवारास अर्ज हा श्री. नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, ९, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- ११०१२४ या पत्त्यावर पाठवायचा आहे.