काँग्रेस, उबाठा गट एकत्र येण्यावर शरद पवार म्हणतात...
16-Aug-2023
Total Views | 149
मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीमुळे काँग्रेस आणि उबाठा गट वेगळा फॉर्म्युला तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर, या केवळ चर्चा आहेत. ही वस्तूस्थिती नाही. राऊत यांचं निवेदन पाहिलं असेल. त्यात त्यांनीही सांगितलं की, या सगळ्या बाबी असत्यावर आधारित आहेत. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
गुप्त भेटीवर बोलताना पवार म्हणाले, "भेट झाली नाही, असं नाही. मला भेटायला आले. पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी कुठलाही कुटुंबिक प्रश्न असेल तर, म्हणजे माझ्या कुटुंबात एक पद्धत आहे, माझा एक सल्ला घ्यायचा. त्यासाठी कुणी आलं असेल तर त्यावर अधिक काही समजयाचं कारण नाही. अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मी माध्यमांच्या समोरुन गेलो. माझी काच खाली होती. मी फुलं स्वीकारली. तुम्ही बघितलं होतं का? मला तिथे फुलं दिली. मी फुलं घेतली मग निघालो. मी माझ्यापुरता सांगू शकतो. इतर लोकांबद्दल सांगू शकत नाही.” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
“आमचे काही सहकारी गेले. त्यापैकी काही लोक मला भेटले आणि त्यांनी एक नवीन माहिती दिली, या देशामध्ये राजकीय निर्णय राजकीय पक्ष, राजकीय नेते घेतात, असं मला वाटत होतं. पण माझे काही सहकारी त्यांचा निर्णय घेण्याआधी मला भेटले होते. त्यांच्याकडून मला एक नवीन कळलं की, राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते निर्णय घेतात त्याहीपेक्षा एक पवनशक्ती, जिच्यामध्ये ईडी आहे. ती ईडी हे निर्णय घेतात, असं आता दिसायला लागलं आहे. त्यांनी कुणाच्या बाबतीत कधी घेतलं असं मला माहिती नाही.” असं शरद पवार म्हणाले.