ठाकरेंनी घेतली राऊतांची मुलाखत? पॉडकास्टच्या प्रोमोनंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चा!
10-Aug-2023
Total Views | 114
मुंबई : उबाठा गटाकडून 'आवाज कोणाचा' हा पॉडकास्ट चालवला जातो. या पॉडकास्टमध्ये काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. आता 'आवाज कोणाचा' या पॉडकास्टचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.
या प्रोमोमध्ये खुद्द संजय राऊतच मुलाखत देत आहेत. पण या प्रोमोमध्ये कुठेही मुलाखत घेणारा व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे संजय राऊत यांची मुलाखत नेमकं कोण घेत आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. काही नेटकऱ्यांनी संजय राऊत यांची मुलाखत उद्धव ठाकरे तर घेत नाहीत ना? असा अंदाज बांधला आहे.
'आवाज कोणाचा' पॉडकास्ट संजय राऊत यांनी चालू केला होता. पण त्या पॉडकास्टला मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे या पॉडकास्टची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्याकडे देण्यात आली होती. तेव्हापासून आदेश बांदेकरच कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्याची मुलाखत घेतात. पण काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. त्यावेळी मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची आणि उध्दव ठाकरेंनी दिलेल्या उत्तरांची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली होती.
आता संजय राऊतच 'आवाज कोणाचा' या पॉडकास्टमध्ये पाहुणे म्हणून येणार असल्यामुळे नेटकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. संजय राऊत नेमकं यावेळी काय बोलतात? आणि संजय राऊत यांची मुलाखत कोण घेत आहे? या प्रश्नांची उत्तरं 'आवाज कोणाचा' हा पॉडकास्ट रिलीज झाल्यावरच आपल्याला मिळणार आहेत.