पंतप्रधानपदाचं स्वप्न पहाणाऱ्या शरद पवारांकडे केवळ १६ आमदार शिल्लक!
05-Jul-2023
Total Views | 215
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा आज निर्णायक दिवस असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मेळावे बोलवण्यात आले आहेत. यात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला अवघ्या १२ ते १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह काही मोजक्या नेत्यांची उपस्थिती आहे.दरम्यान सक्षणा सलगर यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर घोषणाबाजी देताना दिसत आहेत.
05 July, 2023 | 13:3
दरम्यान किरण लहामाटे ,अशोक पवार,रोहीत पवार,देवेंद्र भुयार,राजेंद्र शिंगणे,अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड,बाबा जानी दुर्रानी,शशिकांत शिंदे,बाळासाहेब पाटील ह्या आमदारासह राज्यसभेचे खासदार फौजिया खान ,वंदना चव्हाण,अमोल कोल्हे,श्रीनिवास पाटील हे यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठकीला पोहचलेले आहेत. तसेच अजित पवारांच्या बैठकीला ही २४ आमदार पोहचलेले आहेत.