‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, कमावले ६.४५ कोटी

    04-Jul-2023
Total Views | 111

baipan bhari deva
image source - बाईपण भारी देवा पोस्टर
मुंबई : “मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये खरे यश हे मायबाप प्रेक्षकच मिळवून देतात”, अशी आनंदी प्रतिक्रिया ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. १६ जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्य़ा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ६.४५ कोटींची कमाई केली आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत किंवा प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवतात या परिस्थितीला या चित्रपटाने सडेतोड उत्तर दिले आहे असेच म्हणावे लागेल.
 
गेल्या काही वर्षांमध्ये एकीकडे हिंदी चित्रपटांची तिकिट बारीवरील कमी होणारी कमाई तर दुसरीकडे मराठी चित्रपट आपले आशय-विषय सांभाळून मिळवत असलेली प्रेक्षकांची भरघोस दाद आणि कमाई अशी स्थिती दिसून येत आहे. ‘वेड’, ‘चंद्रमुखी’, ‘सैराट’, ‘मुळशी पॅटर्न’, अशा कोटींचा गल्ला कमावणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत आता बाईपण भारी देवा या चित्रपटाचे नाव देखील सामिल झाले आहे. चित्रपटाने मिळवलेल्या या यशाबद्दल अधिक बोलताना केदार शिंदे म्हणाले की, “दादरमधील शिवाजी मंदिर ते प्लाझा हे अंतर पार करण्साठी मला २१ वर्ष लागली. या आधी मी दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत होते परंतु बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई होत नव्हती. मात्र, या चित्रपटाने सर्व सीमा पार करुन इतक्या कमी दिवसांत भरघोस कमाई केल्यामुळे आता पुन्हा नव्या जोमाने चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झालो आहे”, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, नावाप्रमाणेच या चित्रपटात दिग्गज अभिनेत्रींनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब मुख्य भूमिकेत आहेत. अनेकदा स्त्रीयांवर किंवा स्त्रीयांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे कथानक हे त्यांच्या अडचणींचा किंवा अपेक्षांचा पसाराच चित्रपटातून मांडणार अशी विचारसरणी असते. परंतु या चित्रपटात स्त्रीला तिच्या मनातील आवाज ऐकू येतो आणि तिच्या मनाला वाटेल असे जीवन ती कशा पद्धतीने जगते याचे वर्णन या चित्रपटात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121