'समृध्दी'वर डिझेल चोरणारी टोळी सक्रिय! एकजण पोलिसांच्या ताब्यात

    29-Jul-2023
Total Views | 161

Samriddhi Highway 
 
 
मुंबई : समृद्धी महामार्गावर उभ्या वाहनातून डिझेल चोरीचे प्रकरण चर्चेत येत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक, कंटेनरसारख्या गाड्यांच्या डिझेल टँकमधून पाईप आणि मोटरच्या सहाय्याने डिझेल चोरी केली जात होती. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला होता. या टोळीतील एकाला बेड्या घालण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. अनिल पवार, गजानन पवार, योगेश दाजी ह्या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
 
समृद्धीवरील बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र दुसरबीड व उपकेंद्र फर्दापूर दरम्यान उभ्या असलेल्या जड वाहनातील डिझेल चोरणारांनी धुमाकूळ घातला आहे. महामार्गावर टोलनाक्यांचा आसरा घेत वाहन चालक हे रात्रीला आराम करण्यासाठी, आपले वाहन उभे करतात. वाहन चालकांना झोप लागल्यानंतर डिझेल टाकीचे ‘लॉक’ तोडून गाडीमधील डिझेल स्वयंचलीत मोटारपंपाच्या साह्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या स्वतःच्या कॅनमध्ये भरून चोरटे मोकळे होतात. इंधन चोरीच्या वाहनचालकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यासाठी शोध मोहीम राबवूनही डिझेल चोर हाती लागत नव्हते.
 

Samriddhi Highway 
 
१४ जून रोजी रात्री ११.२५ वाजताच्या दरम्यान पोलिस पथकाची रात्रीची गस्त सुरु होती. समृद्धी महामार्ग चॅनेल क्र. ३१० जवळच्या पेट्रोल पंपानजीक डिघोळे यांच्या हॉटेलवर दोन जण चहापाणी करण्यासाठी थांबले होते. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, कर्मचारी दिनकर राठोड, अरुण भुतेकर व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सचिन सनान्से, उमेश नागरे, चालक गणेश चाटे आदिंना एक स्कार्पिओ (एम. एच. १५ – ईबी – ०४८७) आढळून आली. गस्त चमूने त्यांची विचारपूस केली असता दोघांनी उडवाउडीची उत्तरे दिली. दुसऱ्या स्विफ्ट डिझायरच्या चालकाने पोलिसांना पाहताच जालना दिशेने भरधाव वेगात धूम ठोकली. त्यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलीस पथकाने स्कार्पिओची तपासणी केली. तेंव्हा त्यात ३५ लिटर क्षमतेच्या पाच ते सहा रिकाम्या कॅन्स आढळून आल्या.
 
दोघांनीही आपण डिझेल चोरण्यासाठी आलो होतो, हे कबूल केले. त्यांची नावे शेख अल्ताफ शेख आयुब वय २४ वर्षे रा.दहेरकर वाडी, जुना जालना व मोहम्मद फैजान मोहम्मद रफीक वय २८ वर्षे राहणार संजयनगर, जुना जालना अशी आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121