“रात्री दारु प्यायची आणि सकाळी देवाची भूमिका करायची?” - विवेक अग्निहोत्री

    27-Jul-2023
Total Views | 98

vivek agnihotri and aadipurush






मुंबई :'
द काश्मिर फाईल्स' चित्रपटामुळे स्वत:ची स्वतंत्र ओळख तयार केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायमच त्यांच्या रखड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी मणिपूर प्रकरणावरुन एका नेटकऱ्याला सुनावले होते. त्यांचे ते वक्तव्य चर्चेच असतानाच आता त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी देखील अग्निहोत्री यांनी आदिपुरुषमधील कलाकार प्रभास, सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा दिग्दर्शक किंवा लेखक अशाप्रकारचे चित्रपट तयार करतात तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे संशोधन करत नाहीत आणि त्यामुळे गोष्टी बिघडतात.
 
जर तुम्ही कोणत्याही धार्मिक विषयावर चित्रपट तयार करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के पूर्ण प्रयत्नाने संशोधन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही रात्री दारु पिणार आणि सकाळी उठून देवाची भूमिका करणार तर लोकं तुमच्यावर कसं विश्वास ठेवणार, असे खोचक विधान विवेक अग्निहोत्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बातचीत करताना केले.

 
तुम्ही चित्रपट तयार करण्यासाठी धार्मिक विषयांची निवड करता. ज्यात अनेकांची आस्था असते. पण त्यात तुमची देखील श्रद्धा असायला हवी. नाहीतर तुम्हाला एखाद्या इतिहासकारासारखी माहिती देखील हवी. दुर्देवाने भारतातील दिग्दर्शक किंवा फिल्ममेकर अशा कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायला मागत नसल्याची खंत विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121