चांद्रयान-३ च्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे तिरुपतीला साकडे

    13-Jul-2023
Total Views | 92
isro  
 
मुंबई : चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. शुक्रवार, १४ जुलै रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे. चंद्रावर भारताच्या तिसऱ्या मोहिमेपूर्वी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी तिरुपती मंदिरात जाऊन तिरुपतीचे आशिर्वाद घेतले.
 
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ च्या मॉडेलची पूजा केली. प्रत्येक मोठ्या मोहिमेपूर्वी, इस्रोचे शास्त्रज्ञ मोहिमेच्या यशासाठी तिरुपती मंदिरात प्रार्थना करतात. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर लँडिंग करणारा करणारा जगातील चौथा देश बनेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे.
 
चंद्रयान-२ मध्ये विक्रम लँडरच्या हार्ड लँडिंगमुळे चांद्रयान २ मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. यावेळी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अनेक चाचण्यांनंतर लँडरच्या डिझाइनमध्ये सुधारणा केली आहे, जेणेकरून यावेळी मोहिमेचे यश सुनिश्चित करता येईल. चंद्रयान-3 चंद्रावर पाठवण्यासाठी एलव्हीएम-३ लाँचरचा वापर केला जाईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121