मुंबई : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “महाविकास आघाडी हा एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे. उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वतःहून लव्ह जिहादची बळी पडलेली आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून शिल्लक सेनाची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जी फरपट होत आहे तोही एक प्रकारचा लव्ह जिहादच आहे. त्यामुळे आता शिल्लक सेनेला आसपासचं भगव्या ऐवजी हिरवं दिसायला लागलं आहे.”
"शिल्लक सेना स्वतःचं किती अधःपतन करुन घेणार आहे. अहो, राऊत… आमचं सोडा…. तुमच्या सोबत असणाऱ्या अबू आझमीला औरंग्या प्रिय आहे… आता तो तुम्हालाही वाटायला लागलाय का? कारण त्यावर तुम्ही तोंड उघडलेलं नाही…साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत." असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.