सिनेस्टाईल दरोडा टाकणाऱ्या मास्टरमाईंड उस्मानसह ६ आरोपींना अटक!
५ लाख, पिस्तूल, दुचाकी, काडतुसे जप्त!
28-Jun-2023
Total Views | 202
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी प्रगती मैदान बोगदा येथे झालेल्या दरोडा प्रकरणाची नवीन माहिती उडकीस आली आहे. या लुटमारीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४.९८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २ दुचाकी, १ पिस्तूल आणि २ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांच्या २ पथकांनी ५ आरोपींना पकडले, तर उत्तर जिल्हा आणि नवी दिल्ली जिल्ह्याच्या संयुक्त पथकांनी २ आरोपींना पकडण्यात यश मिळविले.
दिल्ली पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले होते, ज्यामध्ये चार मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी कार अडवली आणि ओमिया एंटरप्रायझेस डिलिव्हरी एजंट आणि त्याच्या सहकाऱ्याला चांदनी चौक येथे लुटल्याचे उघड झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उस्मान, त्याचा चुलत भाऊ इरफान, अनुज मिश्रा, कुलदीप, सुमित, प्रदीप आणि बाला यांचा समावेश आहे. हे प्रकरण समोर येताच दिल्ली पोलिसांनी वेगवेगळी टीम कामाला लावली.
उस्मान अली उर्फ कल्लू याने या घोटाळ्याचा कट रचला होता. तो बुरारी येथील कौशिक एन्क्लेव्हचा रहिवासी आहे. केवळ २५ वर्षीय उस्मान कोणत्या वाहनात पैसे आहेत आणि कोणत्या नाहीत याची माहिती देत असे. उस्मानने ७ वर्षांपासून अॅमेझॉन कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले आहे. कुरिअरच्या कामामुळे या भागात रोकड येते आणि जाते हे त्याला माहीत असायचे. आयपीएलचे अनेक सट्टे गमावलेल्या उस्मानवर बँकेचे कर्जही होते.
तसेच त्याचा चुलत भाऊ इरफान सलूनच्या दुकानात काम करायचा. दोघांनीही दरोड्याचा कट रचला आणि लोणी आणि बागपतच्या काही मुलांना सोबत घेतलं. या लोकांनी चोरीच्या दुचाकीची व्यवस्था करून अनेक दिवस रेकी केली. दरोड्याच्या एक दिवस आधी त्याने बोगद्याची रेकी केली होती. दरोड्यात वापरलेली चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
त्याने आधी कार थांबवून तिची खिडकी उघडली, नंतर पिस्तुल दाखवून पैशांनी भरलेली बॅग लुटून पळ काढल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रेकी केल्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणाची उकल करण्यासाठी अनेक माध्यमातून विश्लेषण आणि प्रयत्न करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. सध्या सर्व आरोपींची चौकशीही सुरू आहे.