मुंबई : खासदार संजय राऊत धमकीप्रकरणी मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंदे याने धमकीचा कट रचला.
यासंबंधी, मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे का? केली असेल तर त्याने धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली ? असे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांना सवाल विचारला आहे. जनतेला माहिती मिळायला हवी. असे संदीप देशपांडे यांनी मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे.