"पवार ढोंगी पुरोगामी!" सुषमा अंधारेंचं ते वक्तव्यं व्हायरल!
13-Jun-2023
Total Views | 152
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. शरद पवारांसमोर अश्रु ढाळुन सहानुभुती मिळवणाऱ्या अंधारेंनी "पवार ढोंगी पुरोगामी!" असं वक्तव्य केलं होत. मात्र, आता ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांना याच वक्तव्यांचा विसर पडला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, "नरेंद्र दाभोलकरांना लोकांनी गोळ्या घालुन मारलं, तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही. लोकांवर जातीय हल्ले झाले, तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही. माणसांच्या कत्तली केल्या, कोंडुन मारले अगदी माणसांना विटंबना करुन मारले, तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही."