मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता योगेश सोमण यांनी केरळ स्टोरी चित्रपटाच्या कथेविषयी भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करत असे लिहिले आहे, "रामदास स्वामी यांनी या चित्रपटाची कथा अवघ्या ४ ओळीत ४ शे वर्षांपूर्वी लिहून ठेवली होती."
सोमण ओळींचे स्पष्टीकरण देत पुढे म्हणाले, "अस्मानी सुलतानाच्या ४ ओळी मला यानिमित्ताने आठवतात. केरल स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहून ठेवली होती. ती अशी,
किती गुजरीणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या
किती षांमुखी जहाजी फाकविल्या
किती एक देशांतरी त्या विकिल्या
किती सुंदरा हाल होऊनि मेल्या"
रामदासांनी लिहून ठेवलेल्या श्लोकातील या चार ओळींचा अर्थ केरला स्टोरी चित्रपटाची पूर्ण कथेला चपखल लागू होतो.याच चार ओळींचा श्लेष सोमण यांनी समजावून सांगितलं आहे.