सत्तासंघर्षाचा निकाल उद्या ; ठाकरे आणि शिंदे गटाचे 'हे' नेते दिल्लीसाठी रवाना!
10-May-2023
Total Views | 140
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ८ मे ते १५ मे दरम्यान निकाल लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ मो रोजीच सत्तासंघर्षावर निकाल लागणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल परब दिल्लीला रवाना झाले आहेत.
शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरण्याबाबत ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता यावर काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या निकालाचे संकेत सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी आज दिले आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार कोसळणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सत्तेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता विधिज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनिल परब आणि राहुल शेवाळे यांच्या दिल्लीत जाण्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लक्ष लागून राहिले आहे.