पर्यटन नवा विचार, नवी दिशा

    30-Apr-2023
Total Views | 195
 
tourism
 
 
महाराष्ट्र राज्याला 720 किमीचा लाभलेला समृद्ध समुद्रकिनारा, उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी इससन पूर्व दुसर्‍या शतकात लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, राज्यातील विविध धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने आहेत. प्रदेशनिहाय असलेल्या वैशष्ट्यपूर्ण कृषी आणि खाद्य संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत असतात. महाराष्ट्र राज्य आपल्या नैसर्गिक व ऐतिहासिक या पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक आणि ‘आयटी’ क्षेत्रातही करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. हाच विचार घेऊन महाराष्ट्र शासन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात समृद्ध आणि जबाबदार पर्यटन राबवत आहे.
 
 
राज्यातील पर्यटन स्थळे जागतिक पातळीवर नेणार
 
राज्यातील पर्यटन वाढावे, यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपक्रम राबवित आहे. आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देणे, कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, साहसी पर्यटन धोरण, कॅरेव्हान पर्यटन ही नवीन पर्यटन धोरण राबविणे, पर्यटन करताना पर्यावरण हानी होऊ नये, यासाठी समृद्ध व जबाबदार पर्यटनास चालना देणे, गड-किल्ले संवर्धनावर भर देणे, पर्यटकांना बदलत्या काळानुसार निवास व न्याहरी सुविधा या चांगल्या दर्जाच्या देणे, पर्यटन विषयक उपक्रमांचे वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर बनवले असून, त्याप्रमाणे राज्यात पर्यटन उपक्रम राबवणे. पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या सहभागीदारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करणे, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटींचे आयोजन करणे, राज्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करून पर्यटन वाढीसाठी शासनाचे धोरण नेहमीच लवचिक राहील, यासाठी प्रयत्नशील आहोत. पर्यटन क्षेत्रातील विविध काम करणार्‍या संस्था व शासन यांमध्ये संवाद वाढवून समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर नेण्याचा आमचा मानस आहे.
 
 
शाश्वत, सुरक्षित व अनुभवजन्य पर्यटनावर भर
 
पर्यटन क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे सध्याच्या धोरणात कालानुरूप बदल करून गुंतवणूक, रोजगार आणि माहिती तंत्रज्ञान आधारित कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी राज्याचे नवीन पर्यटन धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. पर्यटनवाढीसाठी स्थानिक संस्कृतीचे जतन करून समृद्ध व जबाबदार पर्यावरणपूरक पर्यटनावर भर देण्यात येत आहे. हे धोरण या क्षेत्रात नवीन संधी आणि रोजगारनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
 
 
पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर
 
राज्यात जास्तीत जास्त पर्यटन वाढावे, यासाठी स्थानिक लोकसंस्कृती व येथील पर्यटनाची बलस्थाने लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने पर्यटन विषयक उपक्रमांचे पर्यटन कॅलेंडर बनवले आहे. यामध्ये आळंदी, देहू आणि पंढरपूरची वारी, अजिंठा-वेरूळ फेस्टिवल, गणेशोत्सव, किल्ले महोत्सव आणि वाईन महोत्सव या जागतिक दर्जाच्या पाच महोत्सवांचे आयोजन केले जाईल. त्याचबरोबर, सिंधुदुर्ग येथे बीच महोत्सव, नागपूर येथे संत्रा महोत्सव, मुंबई येथील ऐतिहासिक वारसा स्थळ महोत्सव, पुणे येथील कृषी महोत्सव, शिवनेरी, रायगड महोत्सवांचे 2022-23 या वर्षात आयोजन केले जाणार आहे. वर्षभरात महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक संस्कृतीची माहिती पर्यटकांना व्हावी, यासाठी हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील.
 
 
राज्य पर्यटन पुरस्कार योजना
 
राज्यात पर्यटन वृद्धी व्हावी, स्थानिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढून, बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने ‘व्हेकेशनल रेन्टल होम’ तसेच ’होम स्टे’ योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी करणार्‍या सहभागीदारांना सन्मानित करण्यासाठी ‘राज्य पर्यटन पुरस्कार’ योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 25 एवढ्या पुरस्कारांची वर्गवारी केलेली असून त्या अंतर्गत एकूण 48 पुरस्कार देण्याबाबत काम सुरू आहे.
 
 
 
tourism
 
 
नवीन विशेष पर्यटन क्षेत्र
 
नवीन पर्यटन धोरण, 2016 अंतर्गत राज्यात विशेष पर्यटन क्षेत्र घोषित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्याला ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणखी 32 पर्यटन तालुका विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचे कामदेखील सुरू आहे. राज्यात सध्या लागू असलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमध्ये कालानुरूप बदल करण्यात येणार आहेत.
 
 
पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक
 
राज्यातील पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूकदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व त्यायोगे राज्यात पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयांतर्गत गुंतवणूक सुविधा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील राष्ट्रीय, राज्य, इतर जिल्हा मार्गावर असलेल्या किंवा त्यालगत असलेल्या पर्यटनस्थळांना भेट देणार्‍या पर्यटकांसाठी सार्वजनिक अथवा खासगी तत्वावर सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. राज्यातील 20 रोपवेबाबत ‘नॅशनल हायवे लॉजिस्टिक्स’ समवेत सामंजस्य कराराबाबतची प्रक्रिया सुरू आहे.
 
 
साहसी पर्यटन प्रशिक्षण केंद्र
 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे व नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे साहसी पर्यटन प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पणन व उत्पन्न वाढीकरिता विविध राज्यांच्या पर्यटन महामंडळांसोबत सामंजस्य करारदेखील करण्यात येणार आहे.
 
 
पर्यटन महोत्सवांचे आयोजन
 
पर्यटक निवासांमध्ये 100 दिवसांत विविध महोत्सव आयोजित करणे, पर्यटकांच्या सोयीसाठी आणि त्यांना माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मोबाईल अ‍ॅप तयार करणे, दिल्ली हाट येथे महाराष्ट्र खाद्य महोत्सव आयोजित करणे, या बाबी विशेषत्वाने मार्गी लावण्यात येणार आहे.
 
 
पर्यटक निवास सुरू करणे
 
आगामी कालावधीत अक्कलकोट, नवेगाव बांध, चांदपूर, भक्त निवास कळंब, हिंगणा, वेण्णा नदी (पर्यटन सुविधा), वेरूळ, रायपूर (पर्यटन सुविधा) याठिकाणी पर्यटक निवास सुरू करणे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या प्रक्रियेमध्ये वाढ करणे, शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी संस्था तसेच बचत गट यांना अनुदान स्वरुपात प्रोत्साहने देऊन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी मदत करणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.
 
 
महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळी पर्यटन
 
महाराष्ट्र राज्यातील ज्यू वारसा स्थळांची माहिती पर्यटनाच्या नकाशावर यावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्रायलचे महावाणिज्य दूत कार्यालयाच्या सहकार्याने लवकरच यामध्ये मुंबई आणि ठाणे येथील सिनेगॉग आणि सिमेट्रिज तसेच पनवेल, पुणे आणि अलिबाग येथील ज्यू वारसा स्थळांचा यामध्ये समावेश असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ज्यू स्मारकांची ओळख जगभरातील पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. ज्यू वारसा स्थळ पर्यटनाबाबत इरादापत्रावर नुकतीच स्वाक्षरी झाली. पर्यटकांनी अधिक माहितीसाठी मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासातील अनय जोगळेकर यांच्याशी 9769474645 या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्यू वारसा स्थळांच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी टूर पॅकेज तयार करण्यात येणार आहेत.
 
 
राष्ट्रीय पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी
 
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19च्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्र राज्याने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली आहे. राज्याला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण नऊ पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
 
 
‘अनलिमिटेड महाराष्ट्र’ पॉडकास्टसह ‘कानोदेखी’
 
पॉडकास्ट हे पर्यटनाला चालना देणारे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. पर्यटनाचा कायापालट करण्याचा एक भाग म्हणून, ‘अनलिमिटेड महाराष्ट्रा’सह ‘कानोदेखी’ ही मालिका रेडिओ सिटी 91.1 एफएमवर साप्ताहिक सहा महिन्यांसाठी प्रसारित केली जाईल. ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भाग दाखवले जाणार आहेत.
 
 
टीव्ही मोहीम
 
महाराष्ट्रातील विशिष्ट पर्यटनस्थळे आणि अनुभवांना प्रोत्साहन देण्यासाठी, पर्यटन विभागाने महाराष्ट्र पर्यटनाच्या चांगल्या जाहिराती आणि प्रसिद्धी एकत्रित करण्यासाठी चार दूरचित्रवाणी मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.
 
 
हिस्टरी टीव्ही 18
 
हिस्टरी टीव्ही 18 यांच्याद्वारे ’रोड ट्रिप विथ आर एन एम’ या शीर्षकांतर्गत महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांसह स्थानिक खाद्यसंस्कृतीवर आधारित भागाची निर्मिती करून ‘सीएनएन’, ‘न्यूज 18’ व ‘सीएनबीसी’ या दूरचित्रावाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, अलिबाग, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिकमधील किल्ले, मंदिरे, कला आणि संगीत, वन्यजीव, महाराष्ट्रातील आश्चर्ये, सण आणि बांधकामाच्या थीम वर आधारित कार्यक्रम व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आणि डेस्टिनेशनचा प्रचार करण्यासाठी काही खास कार्यक्रम ‘नॅशनल जिओग्राफिक चॅनल’ आणि ‘फॉक्स लाईफ’, रोड ट्रिप विथ ठछच् हे हिस्ट्री ढत18 डऊ आणि कळीीेीूं ढत18 कऊ वर प्रसारित केले जाईल.
पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी
 
महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रात विविध सामंजस्य कराराद्वारे सहा हजारांहून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाने तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तसेच, कृषी पर्यटन क्षेत्रातील नोंदणीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र कोओपरेटिव्ह डेव्हलपमेंट लिमिटेड’ सोबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 
 
जुन्नर येथे ’हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023’
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला, असे हे ठिकाण मराठी मनाची अस्मिता, अराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी आपण राज्यभरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरी केली. दि. 18 ते 20 या तीन दिवस विविध कार्यक्रर्मांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव सोहळा, शिवकालीन गाव, टेंट सिटी, महाआरती, मराठी बाणा कार्यक्रम, जाणता राजा अशा विविध कार्यक्रमांचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते.
 
 
लाईट अ‍ॅण्ड साऊंड शोचे आयोजन
 
गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित लाईट अ‍ॅण्ड साऊंड शोचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात भरीव काम केलेल्या महिलांच्या जीवनावर आधारित लाईट अ‍ॅण्ड साऊंड शोचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
इतर महत्त्वाच्या योजना आणि उपक्रम
 
पर्यटनवाढीसाठी सामंजस्य करार
‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’मध्ये 2022 साली सहभाग
कास पठारावर ‘ई-बसेस’ व ‘बायोटॉयलेट’चे लोकार्पण
मुंबईतील 75 व्हिडिओ
‘हो-हो’ बस सेवा
राज्यातील ऐतिहासिक इमारतींवर विद्युत रोषणाई
‘जी 20’च्या प्रतिनिधींना पर्यटनस्थळांची माहिती
’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट
360 व्हिडिओ, पॉडकास्ट आणि ब्लॉग
नवीन माहिती पुस्तका
चॅटबोट प्रणाली
 
- मंगलप्रभात लोढा
 
पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य रोजगारमंत्री, महाराष्ट्र
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121