मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात झाला आहे. अनेक वाहनं एकमेकांना धडकली आहे.
एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे.
सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, काही जण जखमी झाले आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
ट्रक आणि अनेक कार यांची जोरदार धडक झाली. जवळपास 7 ते 8 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे