'माँ कामाख्या कॉरिडॉर' आता नव्या रूपात!

    19-Apr-2023
Total Views | 60
now-maa-kamakhya-corridor-will-be-rejuvenated-on-the-lines-of-kashi-vishwanath-corridor

गुवाहाटी : भारतातील आसाम राज्यातील सर्वात मोठे शहर गुवाहाटी येथे लवकरच एक मोठा प्रकल्प सुरू होणार आहे. गुवाहाटीमध्ये आत्याधुनिक 'माँ कामाख्या कॉरिडॉर' आसाम सरकारने तयार केला आहे. म्हणजेच लवकरच राज्य सरकार 'माँ कामाख्या कॉरिडॉर'चे काम सुरू करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनीही एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर करून ही झलक दाखवली आहे.



मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी दि.१८ एप्रिल रोजी ट्विट करून एक व्हिडिओ शेअर केला आहे. देशातील आणि जगातील कोट्यवधी लोकांची ज्या शक्तीपीठावर श्रद्धा आहे त्याचा तो व्हिडीओ होता. व्हिडिओ शेअर करताना मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, नूतनीकरण केलेला 'माँ कामाख्या कॉरिडॉर' नजीकच्या भविष्यात कसा दिसेल याची झलक मी शेअर करत आहे. उत्तर प्रदेशच्या 'काशी विश्वनाथ कॉरिडॉर' आणि मध्य प्रदेशच्या 'महाकाल कॉरिडॉर'च्या धर्तीवर त्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.


now-maa-kamakhya-corridor-will-be-rejuvenated-on-the-lines-of-kashi-vishwanath-corridor


नीलाचल पर्वतावरील ५१ शक्तीपीठांपैकी सर्वात पवित्र 'माँ कामाख्या' मंदिर

माँ कामाख्या किंवा कामेश्वरी ही इच्छाशक्तीची प्रसिद्ध देवी आहे, जिचे प्रसिद्ध मंदिर गुवाहाटीच्या पश्चिम भागात नीलाचल पर्वताच्या मध्यभागी स्थित आहे. गुवाहाटी ही ईशान्य भारतातील आसाम राज्याची राजधानी आहे. असे मानले जाते की माँ कामाख्या देवालय हे पृथ्वीवरील ५१ शक्तीपीठांपैकी सर्वात पवित्र आणि सर्वात प्राचीन आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेल्या शक्तिशाली तांत्रिक शक्ती पंथाचा हा केंद्रबिंदू आहे.


now-maa-kamakhya-corridor-will-be-rejuvenated-on-the-lines-of-kashi-vishwanath-corridor


नीलाचल पर्वताच्या या भागातील मुख्य मंदिर माँ कामाख्याचे आहे परंतु संकुलात इतर अनेक मंदिरे आहेत. 'माँ कामाख्या'च्या मुख्य मंदिराव्यतिरिक्त, कामाख्या (म्हणजे मातंगी आणि कमला असलेली त्रिपुरा सुंदरी), काली, तारा, भुवनेश्वरी, बगलामुखी, चिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, दशमहाविद्या (देवतेचे दहा अवतार) मंदिरे आहेत. दुसरीकडे, नीलाचल टेकडीभोवती शिवाची पाच मंदिरे आहेत, कामेश्वर, सिद्धेश्वर, केदारेश्वर, अमरटोकेश्वर, अघोरा आणि कौटिलिंग, ज्यांना कामाख्या मंदिर परिसर असेही म्हणतात. अशा परिस्थितीत माँ कामाख्या मंदिराचे केवळ स्वरूपच बदलणार नाही, तर इतर सर्व मंदिरांनाही नवे रूप मिळेल, असे म्हणता येईल.

गुवाहाटी हे एक प्राचीन शहर असून त्याला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. अनेक प्राचीन साहित्य आणि हस्तलिखितांमध्ये प्राग्ज्योतिषपूर असाही उल्लेख आढळतो. याच कारणामुळे आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी अनेक प्राचीन मंदिरांनी नटलेली आहे. नीलाचलच्या टेकडीचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये नीलकुटा, निलगिरी, करणी असे केले आहे. कामाख्या धाम या नावाने प्रसिद्ध असलेले, कामाख्या देवीचे प्रसिद्ध मंदिर गुवाहाटीच्या पश्चिम भागात (९१०४२/ पुर्व - २६०१०/ उत्तर) स्थित आहे.


now-maa-kamakhya-corridor-will-be-rejuvenated-on-the-lines-of-kashi-vishwanath-corridor

('काशी विश्वनाथ कॉरिडॉर')


नीलाचल तीन भागांनी बनलेले आहे (म्हणजे ब्रह्मा टेकडी, विष्णू टेकडी आणि शिव टेकडी). हे मंदिर शहर मैदानापासून सुमारे ६०० फूट उंचीवर आहे. येथे भुवनेश्वरी मंदिर सर्वात उंचावर आहे. जिथून गुवाहाटी शहराच्या विहंगम दृश्याचा आनंद लुटता येतो. नीलाचलच्या टेकडीवर बाणादुर्गा मंदिर, जया दुर्गा मंदिर, ललिता कांता मंदिर, स्मरणकली मंदिर, गदाधर मंदिर, घंटाकर्ण मंदिर, त्रिनाथ मंदिर, शंखेश्वरी मंदिर, द्वारपाल गणेश मंदिर अशी आणखी काही मंदिरे आहेत. हनुमान मंदिर, पांडुनाथ मंदिर (बरहा टेकडीवर स्थित) इ. असा अनमोल इतिहास लाभलेल्या आईचे हे सिद्ध निवासस्थान आता लवकरच नव्या आणि भव्य स्वरूपात पाहायला मिळणार आहे. लवकरच मातेचे हे अनोखे शक्तिपीठ नव्या रंगात आणि रूपात अवतरले.या 'माँ कामाख्या कॉरिडॉर'चा पुनरुज्जीवनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही महत्तवाचा उपक्रम असल्याचे सांगितले आहे.
 


अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121