शिवरायांची वाघनखे आणि जगदंब तलवार लवकरच मिळणार!

सुधीर मुनगंटीवार यांची ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलन गॅम्मेल यांच्याशी विस्तृत चर्चा

    15-Apr-2023
Total Views | 122
Sudhir Mungantiwar's extensive discussion with British Deputy High Commissioner Alan Gammell

मुंबई
: महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उप उच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने आज सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात आज मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे अशी माहीती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ब्रिटनकडून जगदंब तलवार व वाघनखे शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या चर्चेच्यावेळी ब्रिटीश उच्चायुक्तालयातील राजकीय विभाग विषयक उपप्रमुख इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा संकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखं भारतात आणण्याबाबत मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रीटनमधे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रस्तावित बैठकीत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याविषयी तपशीलवार प्रक्रीया ठरविण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक ३५० वा वर्षपूर्ती महोत्सव सुरू असतानाच जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणली जातील, अशी शक्यता आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत ब्रिटीश उपउच्चायुक्त श्री अॅलन गॅम्मेल यांच्या झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, राज्य पुरातत्व संचालक तेजस गर्गे, चेतन भेंडे आणि मंत्री कार्यालयातील अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ब्रिटन महाराष्ट्र सांस्कृतिक देवाण घेवाण होणार

ब्रिटन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाणीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या सांस्कृतिक आदानप्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटन मध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. त्याचबरोबर महाराष्ट्राचे २५ विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे २५ विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक संवादातून दोन्ही संस्कृतींना एक नवी उंची प्राप्त होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच ..

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा ..

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील 'संन्यस्त खड्ग' नाटकाच्या प्रयोगावेळी नेमकं काय घडलं?

(Hrishikesh Joshi Post) पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुण्यात हे नाटक बंद पाडले गेले, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्याबाबत अभिनेते आणि नाटकाचे दिग्दर्शक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121