काँग्रेसच्या ओबीसीद्वेषास न्यायालयाची चपराक; भाजपचा गांधींना टोला

    25-Mar-2023
Total Views | 81
Court slams Congress' OBC hatred
 

मुंबई
: “काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याच्या नावाखाली देशातील ओबीसी समाजाचा द्वेष केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगाविली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाच राहुल गांधी नकोसे झाले आहेत,” असा टोला भाजपतर्फे लगाविण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपतर्फे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दि.२४ मार्च रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रधान म्हणाले, “सुरत न्यायपालिकेने आपल्या निकालाद्वारे देशातील न्यायव्यवस्थेस मजबुती प्रदान केली आहे. पंतप्रधानांसह देशातील ओबीसी समुदायास जातिवाचक शिवी देण्याच्या राहुल गांधी यांच्या कृत्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यामुळे कायद्यानुसारच त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वदेखील रद्द करण्यात आले आहे,” असे प्रधान म्हणाले.

राहुल गांधी यांनी २०१३ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारचा एक अध्यादेश ‘नॉनसेन्स’ म्हणून फाडून टाकल्याची आठवण प्रधान यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसमधील गांधी कुटुंबास स्वत:साठी वेगळे भारतीय दंडविधान आणि वेगळी न्यायपालिका हवी आहे. गांधी कुटुंब हे स्वत:स कायद्यापेक्षा वेगळे समजतात. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या मातोश्रींनीदेखील पंतप्रधान मोदी यांना ‘मौत का सौदागर’सारखी विशेषणे वापरली होती. त्यामुळे काँग्रेसच्या ओबीसीद्वेषास आता चपराक बसली आहे,” असेही केंद्रीय मंत्री प्रधान यांनी यावेळी नमूद केले आहे.

राहुलजी, पक्षातील षड्यंत्रकारी शोधा : अनुराग ठाकूर

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षात देशातील नामवंत वकिलांची फौज उपलब्ध आहे. मात्र, राहुल गांधी यांना कोणीही योग्य सल्ला कसा दिला नाही, याचे आश्चर्य वाटते. कारण, पवन खेरा यांच्या प्रकरणात काँग्रेस पक्ष तत्काळ न्यायालयात गेला होता. मात्र, राहुल गांधी यांच्यावेळी मात्र २४ तासात काँग्रेस पक्ष न्यायालयात गेला नाही.” याद्वारे काँग्रेस पक्षातील कोणा विशिष्ट व्यक्तीस राहुल गांधी नको असून त्यांनीच त्यांच्याविरोधात षड्यंत्र केल्याचा टोला ठाकूर यांनी लगाविला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121