राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, काँग्रेसमध्ये धरणीकंप

- ८ वर्षे निवडणूक लढविण्यास येऊ शकते बंदी

    24-Mar-2023
Total Views | 129
 
rahul gandhi
 
 
नवी दिल्ली : मोदी आडनाव बदनामीप्रकरणी दोन वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लोकसभेचे खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर खासदार किंवा आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात येते. दरम्यान, राहुल गांधी यांना सत्य बोलण्याची शिक्षा करण्यात आल्याची टिका काँग्रेसने केली आहे तर राहुल गांधींच्या सदस्यत्वाविषयी लोकसभा सचिवालयाचा निर्णय देशहिताचा असल्याचे म्हटले आहे.
 
सर्व चोरांचे आडनाव मोदीच असे वक्तव्य २०१९ साली एखा जाहिर सभेत राहुल गांधी यांनी केले होते. त्याविरोधात सुरतमधील न्यायालयात सर्वेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर गुरूवारी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व २३ मार्च २०२३ पासून संपुष्टात येत आहे. अधिसूचनेत, हा निर्णय लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या संविधान कलम १०२ (१) (ई) च्या कलम ८ अंतर्गत घेण्यात आला आहे.
 
लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेची प्रत राहुल गांधी यांनाही पाठवण्यात आली आहे. याशिवाय राहुल यांच्या सदस्यत्वाची नोटीस राष्ट्रपती सचिवालय, मुख्य निवडणूक अधिकारी - तिरुअनंतपुरम, केरळ, एनडीएमसीचे सचिव आणि लोकसभा सचिवालयाच्या सर्व शाखांना पाठवण्यात आली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ९ हजार अश्वशक्ती इंजिनाचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ९ हजार अश्वशक्ती इंजिनाचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मे रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाहोद येथे स्थापन झालेल्या रेल्वे उत्पादन युनिटमध्ये उत्पादित केलेल्या पहिल्या ९ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन करतील. पीपीपी मॉडेल अंतर्गत स्थापन झालेला दाहोद येथील रेल्वे कारखाना पुढील १० वर्षांत १,२०० इंजिन तयार करणार आहे, ज्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याची योजना आहे. १०० टक्के मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लवकरच ही लोकोमोटिव्ह इंजिने पूर्णपणे तयार केली जातील...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121