मुंबई : राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानाचा निषेध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ‘राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, संजय राऊतांनी जे वक्तव्य केले, ते निषेधार्थ आहे. त्याचे कुणीही समर्थन करण्याचे काहीही कारण नाही. विधीमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.