महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी : सिब्बल यांच्या 'या' कृतीने कोर्टात पिकला हशा!

    14-Feb-2023
Total Views | 270

Kapil Sibbal


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी LIVE : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी सिब्बल यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी हातात आयपॅड घेतला होता मात्र, कपिल सिब्बल यांनी हातात कागद घेऊनच युक्तीवाद सुरू ठेवला होता. यावेळी हे असं का असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला. मात्र, त्यावर सिब्बल यांनी मी अजूनही शिकतोयं, असं उत्तर दिल्यानं एकच हशा कोर्टात पिकला.

"विधानसभा अध्यक्ष हे पक्षपाती असू शकत नाहीत, त्यांच्यावर कुठल्याही पक्षाचा प्रभाव असू शकत नाही. विधानसभा अध्यक्ष हे पंचांप्रमाणे काम पहातात. त्यामुळे त्यांची भूमिका पक्षपाती असू नये, त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालेले आहे," असा आरोप यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाचे वकील आपली बाजू मांडत आहेत.

विधानसभा अध्यक्षांचा मुद्दा उपस्थित करून कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दुसरीकडे हरीश साळवे यांनीही कपिल सिब्बल यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी नियमित सुनावणी सुरू आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका यादीत असून त्यात सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार असल्याचे नमूद केले आहे.
खरी शिवसेना कुणाची यावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत.


या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निकालाचीही प्रतीक्षा सुरू असून राज्यातील भाजप शिंदे सरकारवर कायदेशीर आहे किंवा नाही, यावर देखील यानिमित्त शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. घटनापिठापुढे या प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. या घटनापिठात न्यायमुर्ती शहा, न्यायमुर्ती मुरारी, न्यायमुर्ती हिमा कोहली आणि न्यायमुर्ती नार्सिंमा यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भाजपसोबत स्थापन केलेले सरकर हे घटनाबाह्य असल्याचा आरोप केला जातो. यादरम्यान तसेच ठाकरे आणि शिंदे गटात शिवेसना कोणाची यावरून देखील वाद सुरू आहे. दोन्ही गटांकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातो. शिंदे-भाजप सरकार घटनाबाह्य असल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होतो याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121