मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटवॉर पाहायला मिळाले. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला होता. त्यास जितेंद्र आव्हाडांनी Xवर पोस्ट करत माझ्यावर दर वेळेस वयक्तिक टीका कश्यासाठी? अशी विचारणा केली आहे.
दरम्यान, आव्हाडांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन सिक्स पॅक केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो, असे म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर आव्हाडांनी अजित पवारांचा एक फोटोही Xवर पोस्ट केला आहे.