राममंदिरामुळे देशभरात होणार रोजगार निर्मिती; कोट्यावधींचा व्यापारही वाढणार
28-Dec-2023
Total Views | 155
लखनौ : २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतभर त्यानिमीत्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स च्या अहवालानुसार राममंदीर उद्घाटन सोहळ्यामुळे देशभरात २२ जानेवारीला ५०,००० कोटी रुपयांचा अतिरीक्त व्यापार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२२ जानेवारीला रामललांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. त्यामुळेच मातीचे दिवे, त्यासाठी लागणारे रंग, रांगोळी, फुल विक्रेते त्याचबरोबर ईलेक्ट्रीक दिवे, रोशनाई ची सामग्री यांच्या खरेदीविक्रीमुळे हा अतिरिक्त व्यापार होणार असल्याचे सांगितल जात आहे. त्याचबरेबर देशात होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर, पत्रके, स्टिकर्स इत्यादींसह मोठा व्यवसाय आणि प्रचार साहित्य तयार होण्याचीही शक्यता आहे. या व्यापारामुळेच देशात अनेक रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.