ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करा! उपमुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

    28-Dec-2023
Total Views | 134

Fadanvis


मुंबई :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
 
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या तीनही संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "महाजेनकोने सर्व अंगाने ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी अधिक वेगाने काम करणे आवश्यक आहे. कोराडी, पारस व इतर ठिकाणी ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी व्यवहार्यता तपासावी. आपल्याला निरंतर आणि गुणवत्तापूर्ण वीज कशी देता येईल याचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील यंत्रे ही खूप महागडी व जास्त वीज घेणारी असतात. त्यामुळे त्यांना अखंडित वीज पुरवठा करणे आवश्यक ठरते. अन्यथा ही यंत्रे निकामी होतात."
 
"त्याचबरोबर भूमिगत वितरण प्रणाली करण्यावर भर द्यावा. प्रथम २५ टक्के भूमिगत प्रणाली करुन त्याचा अभ्यास करावा. वितरण खर्च किती वाढतो, वीज गळती किती कमी होते याचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने नियोजन करावे. जादा भार असणाऱ्या वितरण वाहिन्या कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि कालबद्ध योजना आखावी. त्याचबरोबर असुरक्षित विद्युत ढाचे दूर करण्यासाठी सीएसआर निधी वापरावा,जेणेकरून यामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील," असेही त्यांनी सांगितले.
 
या बैठकीला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश व ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121