मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला मुंबईतील स्थितीचा आढावा; आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश

    19-Aug-2025   
Total Views |

मुंबई : सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "राज्यातील स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून असून राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या ते संपर्कात आहेत. मुंबईतही त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात मंत्रिमंडळातील सर्व सहकारी राज्यातील विविध भागात जनजीवन सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत."

मंत्री लोढा यांनी यावेळी व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांकडून मुंबईतील सद्य स्थितीबाबत माहिती घेतली. मुंबई आणि उपनगरात काही सखल भागात पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्याठिकाणी तात्काळ पंप लावून पाण्याचा निचरा लवकरात लवकर करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या भागात काही वस्त्या टेकड्यांवर वसलेल्या आहेत. त्याठिकाणी अधिक सतर्क राहून व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना देत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून काळजी घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....