पुण्यात आठ बांग्लादेशी नागरीकांविरूध्द कारवाई!

    15-Dec-2023
Total Views | 101
Eight Bangladeshi Nationals booked by Pune ATS

पुणे : दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट व नारायणगाव पोलिसांकडुन नारायणगाव परिसरात कारवाई करून ८ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. ते सर्व जण अवैध रहवास करताना आढळून आले.

दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मेहबुल नजरून शेख, राणा जमातअली मंडल, गफुर राजेवली शेख आलमगीर जमातअली मंडल,शालोम मुस्तफीजुर मंडल, अफजल हमिबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला, जमातअली व्हायतअली मंडल (फरार) सर्व (सध्या रा. नारायणगाव, पुणे मुळ राहणार बांग्लादेश) हे सर्वजण बेकायदा वास्तव करीत असल्याची माहिती मिळाली.

त्या सर्वांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांग्लादेश सिमेवरील मुलकी आधिका-यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता. ते सर्व अवैधरित्या वास्तव्य करताना आढळून आले. त्या सर्वांच्या विरोधात परकीय नागरीक कायदा १९४६ कलम १४, पारपत्र अधिनियम १९६७ - नियम ३, ६, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरीक आदेश १९५० चे कलम ३ (अ) अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121