सत्तेत असताना ठाकरे-राऊतांनी केलेल्या कामांचा निलेश राणेंनी वाचला पाढा!

    11-Dec-2023
Total Views |

Nilesh Rane

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सत्तेत असताना केलेल्या कामाचा पाढाच वाचला. निलेश राणे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरे आणि राऊतांबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
 
निलेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने सत्तेत येऊन काय केले तर, ठाकरेंनी मुलाला मंत्री केलं आणि संजय राऊतांनी मुलीचं लग्न केलं. विरोधकांची घरे पाडण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय मुलाने नाईट लाईफच्या नावाखाली मर्डर रेप दारू पार्टी ड्रग्स असा धुमाकुळ घातला," असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.
 
 
 
पुढे ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी गळ्यात पट्टा घालून आजारपणाचा आव आणला. पण सत्ता गेली आणि त्यांचा पट्टा गायब झाला. सोशल मीडियावर साधी टीका करणारे वयोवृद्ध, तरुण आणि महिलांना घराबाहेर खेचून मारण्यात आले. बायकोच्या आणि कुटुंबाच्या नावावर अलिबाग आणि इतर ठिकाणी बेनामी जमीन अचानक ठाकरे आणि राऊत कुटुंबाची झाली."
 
 
"कोरोनाच्या नावावर भ्रष्टाचार तर सांगायला नको. यातून मातोश्री २ उभे राहिले. तसेच हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब ठाकरे झाले. त्यामुळे असे सडलेले लोक महाराष्ट्रात, देशात नको आणि सत्तेत तर मुळीच नको," असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121