कुणबीप्रमाणे, ओबीसीतील सर्व वंचित जातींच्या नोंदी शोधाव्या: वड्डेट्टीवार
07-Nov-2023
Total Views | 51
मुंबई : कुणबीप्रमाणे, ओबीसीतील सर्व वंचित जातींच्या नोंदी शोधाव्या. आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या. ओबीसींचं आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण द्या. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध केला आहे. यानंतर आता मराठा आरक्षणविरोधात वड्डेट्टीवार यांनी आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे.
वड्डेट्टीवार म्हणाले, "आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणा धक्का लावू नका. सरसकट आरक्षणाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधीक आत्महत्या विदर्भात होतात. ते ओबीसी आहेत. ओबीसी समाजाला सर्वकाही मिळते, अशी अफवा पसरवण्यात आली. वेगळा प्रवर्ग घ्या, ओबीस आणि मराठा समाजाला दुखवू नका." असे विजय वडेट्टीवार म्हणाले.