नजमा परवीन यांनी केली पंतप्रधान मोदींवर पीएचडी!

    07-Nov-2023
Total Views | 83

Najma Parveen


मुंबई :
जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असताना आता एका महिलेने त्यांच्यावर पीएचडी केली आहे. नजमा परवीन असे या महिलेचे नाव आहे. वाराणसीमध्ये राहत असलेल्या नजमा परवीन या पंतप्रधान मोदींवर पीएचडी करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.
 
नजमा परवीन यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयांतर्गत आपले संशोधन कार्य पुर्ण केले आहे. 'नरेंद्र मोदींचे राजकीय नेतृत्व - एक विश्लेषणात्मक अभ्यास' असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. २०१४ मध्ये सुरु झालेले संशोधन कार्य १ नोव्हेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले.
 
या संशोधनामध्ये मुख्यत्वे पाच प्रकरणे आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदींचे राजकीय जीवन, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे कार्य, विरोधकांकडून होत असलेले आरोप आणि टीकेचा कालावधी तसेच जनता आणि माध्यमांचा त्यांना मिळालेला पाठिंबा इत्यादींचा समावेश आहे.
 
विशेष म्हणजे नजमा परवीन या आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रकाश टाकणारे पुस्तकही लिहित असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते म्हणून प्रस्थापित झाले असल्याने त्यांना त्यांच्या संशोधनासाठी हा विषय महत्त्वाचा वाटला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121