नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं 'झिम्मा २' मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

    06-Nov-2023
Total Views | 40

zimma 2 
 
मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाच्या पहिल्या भागाने समस्त महिलावर्गाला आनंदित केले होते. आता पुन्हा एकदा तिच धम्माल-मस्ती करण्यासाठी सर्व महिला 'झिम्मा २' चित्रपटातून करण्यास सज्ज झाल्या आहेत. नुकतंच या चित्रपटातील पार्टी अॅंथम 'मराठी पोरी' हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
 
खरंतर 'मराठी पोरी' या दोन शब्दांमध्येच या गाण्याचा भावार्थ कळतो. 'इंदू'च्या ७५व्या वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन असून यात प्रत्येकीचा जबरदस्त स्वॅग दिसत आहे. ‘मराठी पोरी' हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एकंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत या गाण्यातून सांगितली आहे. तसेच कलाकारांच्या वेशभूषेने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. 'मराठी पोरी' हे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते डोळ्यांनाही सुखावणारे आहे. अतिशय एनर्जीने भरलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.
 
क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी 'झिम्मा'च्या गाण्यांनी संगीतप्रेमींना भुरळ घातली होतीच, त्यामुळे आता झिम्मा २ मधील संगीताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
 
कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121