एमआरएफ (MRF) ने ३० टक्क्यांचा अंतरिम लाभांश जाहीर केला

    04-Nov-2023
Total Views | 37

MRF
 
 
एमआरएफ (MRF) ने ३० टक्क्यांचा अंतरिम लाभांश जाहीर केला

मुंबई: देशातील ख्यातनाम टायर कंपनी MRF ने तब्बल ३० टक्यांचा अंतरिम लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. कंपनीनुसार कंपनीने यंदा इयर ऑन इयर बेसिसवर ५ टक्यांनी ग्रोथ मिळवली असून व्यापारातून ६.५ टक्यांची महसूल वाढ प्राप्त केली आहे. नुकतीच MRF कंपनीने आपला सप्टेंबर तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे. शुक्रवारी घोषित केलेल्या या निकालात एकत्रित नफा तब्बल ३५१.७१ टक्यांनी वाढला होता जो मागील वर्षी १२९.८६ कोटी रुपये इतका होता. एमआरएफ प्रत्येक ३ म्हणजेच ३० टक्के प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.
 
कंपनीच्या संचालक मंडळाने ३ रूपये प्रति इक्विटी शेअर्स लाभांश जाहीर केल्याचे त्यांनी आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केले आहे. कंपनीने लाभांश वाटपाची तारीख देखील जाहीर केली आहे. नोव्हेंबर १७ ला या लाभांशाचे रोल आऊट वाटप होणार आहे.
 
आत्ताच आर्थिक तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ६२१७.७० कोटींचे महसूल मिळाले होते‌. परंतु लाभांशाचा घोषणेनंतरही बीएसीवर MRF चा शेअर घसरला होता.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121