'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ मध्ये 'या' पदाकरिता महाभरती!

    03-Nov-2023
Total Views | 23
Rashtriya Chemicals and Fertilizers Recruitment 2023

मुंबई : 'राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड'मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून अॅप्रेंटिसशीपची संधी मिळणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीमार्फत मुंबई आणि रायगड विभागासाठी असून या माध्यमातून ४०० हून अधिक अप्रेंटीस पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून ०७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

तसेच, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी १५७ जागा, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी - ११५ जागा, ट्रेड प्रशिक्षणार्थी - १३६ जागा, एकूण रिक्त पदसंख्या - ४०८ जागा भरण्यात येणार आहेत. तर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून निश्चित करण्यात आली असून पदवीधर प्रशिक्षणार्थीसाठी संबधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी या पदाकरिता संबधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, ट्रेड प्रशिक्षणार्थी या पदाकरिता विज्ञान शाखेतून संबधित विषयात बारावी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. तर भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121