संदीप कुमार गुप्ता यांची महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी नेमणूक

    02-Nov-2023
Total Views | 29

Sandeep Kumar Gupta     
 
संदीप कुमार गुप्ता यांची महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी नेमणूक

मुंबई: संदीप कुमार गुप्ता यांची मंडळाच्या संचालकपदी नेमणूक झाली असून ते ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीपासून महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्ष पदावर नेमणूक झाली आहे.
 
संदीप कुमार गुप्ता हे GAIL (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत जी भारतातील एक आघाडीची नैसर्गिक वायु कंपनी आहे, जिचे व्यापार, पारेषण, एलपीजी निर्मिती आणि पारेषण, एलएनजी री-गॅसिफिकेशन, पेट्रोकेमिकल्स, शहरी वायु, ई अँड पी, इ. नैसर्गिक वायु व्हॅल्यू चेनमध्ये विविधांगी हितसंबंध आहेत. गुप्ता हे गेल गॅस लिमिटेड, ब्रह्मपुत्रा क्रॅकर आणि पॉलीमर लिमिटेड ह्या कंपन्यांचे सभापती आहेत आणि पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडचे संचालक आहेत. ते केंद्र शासकीय सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्रायझेस (स्कोप) ह्या मोठ्या व्यावसायिक संस्थेचेही सभापती आहेत. ऑक्टॉबर २०२२ मध्ये गेलमध्ये सहभागी होण्यापूर्वी गुप्ता ह्यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे संचालक (वित्त) पद भूषवले होते.
 
गुप्ता हे इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे फेलो सदस्य आहेत आणि जानेवारी २०२१ मध्ये आयसीएआय द्वारे त्यांचा ‘‘ सीए सीएफओ - लार्ज कॉर्पोरेट - मॅन्युफॅक्चरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॅटेगरी ’’ म्हणून सुप्रतिष्ठित गौरव करण्यात आला. मे २०२२ मध्ये ते स्टार्टअपलेन्स.कॉम द्वारे भारतातील सर्वोच्च ३० सीएफओ मध्ये निवडण्यात आले होते आणि इंडिया टूडे कडून बेस्ट सीईओ - ऑईल अँड गॅस सेक्टर २०२२-२३ म्हणून गौरवण्यात आले. त्यांना तेल आणि वायु उद्योगक्षेत्रात ३५ हून अधिक वर्षांचा विस्तृत अनुभव आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121