सनातन हा धर्म नाही, तर हिंदू धर्मातील कट्टरतावादी लोकांचा गट आहे: जितेंद्र आव्हाड
09-Oct-2023
Total Views | 160
मुंबई : ज्या धर्मामुळे देशात जातीवाद आला. ज्या धर्मामुळे स्त्रीयांना अधिकार मिळाला नाही. तो सनातन धर्म असूच शकत नाही. सनातन हा धर्म नाही, तर हिंदू धर्मातील कट्टरतावादी लोकांचा तो गट आहे. त्यामुळे हा नवा शब्द कुठून आला हे मला समजत नाही. आम्ही २००३ पासून सनातनशी लढाई लढतोय. असं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना आव्हाडांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, "मला मारण्याचा प्रयत्न झाला. माझ्या घरावर हल्ला झाला. हे लोक सनातनी होते. हिंदू धर्म वसुदैव कुटुंबकमच्या वाटेवर जाणारा आहे. सर्वांना आपलं मानणारा आहे. देशामध्ये जो काही पाच हजार वर्षांपासून अन्याय, अत्याचार, शोषण लोकांचे झाले तो सनातनी लोकांनी केला आहे. तुकारामांना, बुद्धांना, महावीर जैनांना, बसवेश्वरांना, सावता माळींना कोणी छळलं असेल तर ते सनातनी लोकांनी."
"शिवाजी महारांचा राज्याभिषेक कोणी नाकारला तर तो सनातन्यांनी, ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना आत्महत्या कोणामुळे केली तर सनातन्यांमुळे. महात्मा फुलेंना दगड-धोंडे, शेण कोणी मारले तर ते सनातन्यांनी. शाहु महाराजांची हत्या करण्याचा प्रयत्न सनातन्यांनी केली. महात्मा गांधींची हत्या सनातन्यांनी केली." असं सनातन धर्माबद्दल बोलत असताना राऊत म्हणाले.