चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? अंधारेंनी, शालिनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं
07-Oct-2023
Total Views | 256
मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? असा सवाल अंधारेंनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांच्या नातवावर बोललात तर तुमच्या कानाजवळ येऊन डीजे वाजवू, इतका वाजवू की अंधारे यांना खरंच अंधार दिसेल, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली होती. या टीकेवर सुषमा अंधारे यांनी शालिनी ठाकरे यांना ट्विट करत प्रत्त्युत्तर दिलं आहे.
भडकले..गुर्गुरले..dj...जाळ..डरकाळी..अरे बापरे.. बाई, ठिकाण , वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे. पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर चे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? @ShivSenaUBT_
सुषमा अंधारे म्हणाल्या, "भडकले..गुर्गुरले..dj...जाळ..डरकाळी..अरे बापरे.. बाई, ठिकाण , वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे. पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर चे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय?" असं प्रत्त्युत्तर सुषमा अंधारेंनी दिलं आहे.