गिरगावातील खोताच्या वाडीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु

    28-Oct-2023
Total Views | 64

mangal prabhat lodha

मुंबई :
गिरगावमधील खोताची वाडी येथील विठ्ठलभाई पटेल मार्गावर मुंबई महानगरपालिकेने नवीन अभ्यासिका तयार केली आहे. ही अभ्यासिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या अभ्यासिकेचे लोकार्पण २५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले.

मुंबईत अनेक कुटुंबे लहान आकारांच्या घरात एकत्र राहतात. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांना अभ्यासकरता अडचणी येतात. त्यातही दक्षिण मुंबईत विशेषतः गिरगाव आणि परिसरात लहान लहान खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा व शांतता शोधावी लागते. त्यामुळे खोताची वाडी परिसरात प्रशस्त अभ्यासिका सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते.

जवळपास २ हजार चौरस फूट एवढ्या प्रशस्त जागेत विद्यार्थ्यांची व्यवस्था केली असल्यामुळे जवळपास ५० विद्यार्थ्यांना एकाचवेळी अभ्यास करता येणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आहे. प्राथमिक स्तरावर दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत अभ्यासिका सुरू राहणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121