नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
मिठीबाई महाविद्यालयातून सुरेश कुमार या बुरशीच्या प्रजातींवर काम करणार्या संशोधक आहेत. त्या सध्या उत्तन औषधी संशोधन संस्थेत संशोधन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. लाकूड सडवणार्या बुरशीच्या प्रजातींवर त्यांचा शोध सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून ही बुरशी गोळा करून त्यावर त्या संशोधन करतात.
‘बुरशी’ या विषयात ‘पीएच.डी’ पूर्ण केलेल्या सशीरेखा यांनी २००४ मध्ये ‘कर्करोगविरोधी बुरशी’ या विषयावर संशोधन केले. या बुरशीमधील कोणता एन्झाइम लाकूड सडवण्यास कारणीभूत आहे, यावर त्यांचे संशोधन सुरू असून त्यांची एक विद्यार्थिनी या विषयावर संशोधन करत आहे. याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बुरशी आढळतात, याबाबतच्या माहितीचेही त्या संकलन करत आहेत.