नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
गृहिणी असल्या तरी पर्यावरणाची आवड, समज आणि जाणीव असणार्या पुर्वी शाह. दैनंदिन जीवनात स्वयंपाकघरात होणारा कचरा हा घराबाहेर जाऊ द्यायचा नाही, हा नियम त्या अगदी कटाक्षाने पाळतात. हा कचरा बाहेर जाऊ न देता त्याचा खत म्हणून त्या वापर करतात.
घराच्या खिडकीच्या किंवा गॅलरीच्या आवारात लावलेल्या झाडांना याचा खत म्हणून वापर त्या करतात, जेणेकरून हा कचरा बाहेर जाऊन त्याचे पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ नयेत. किचन गार्डनिंग, कंपोस्टींग इत्यादी विषयावर त्या कार्यशाळाही घेतात. विशेषतः गृहिनींचे प्रबोधन करण्यावर त्यांचा भर असतो. शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन कचर्याचे वर्गीकरणही करायला त्या शिकवतात.