'ऑलिम्पिक 2036' भारतात होणार? पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

    15-Oct-2023
Total Views | 44
Olympics 
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मुंबईत १४१व्या ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. २०३६ मध्ये भारत ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवण्यासाठी तयारी करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "२०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत बोली लावेल. यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा देशात आणण्याचा भारताचा हा प्रयत्न आहे."
 
मुंबईत आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. मोदी म्हणाले की, "ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारतीय खूप उत्सुक आहेत. १४० कोटी (१.४ अब्ज) भारतीयांचे हे जुने स्वप्न आहे, हीच त्यांची आकांक्षा आहे. तुमच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न साकार करायचे आहे. मला विश्वास आहे की भारताला आयओसीचा पाठिंबा मिळेल."
 
जागतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भारताकडे पायाभूत सुविधा, रसद आणि आवश्यक संघटनात्मक क्षमता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जी-२० शिखर परिषद आणि भारताच्या अध्यक्षपदाचे उदाहरण दिले, ज्या दरम्यान देशातील ६० हून अधिक शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या संघटन क्षमतेचा हा पुरावा असल्याचे ते म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121